उद्या मलाही मारतील,पण मी घाबरत नाही -राहुल गांधी

October 23, 2013 3:28 PM4 commentsViews: 1845

Image img_231962_rahulgandhi3434_240x180.jpg23 ऑक्टोबर :काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची आज राजस्थानमधल्या चुरू इथं सभा झाली. यावेळी त्यांनी अतिशय भावनिक भाषणं केलं. भाजप मतं मिळवण्यासाठी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दंगली घडवते. त्यांची लोकं आग लावतात आणि आम्ही ती विझवतो. पण यामुळे देशाच नुकसान होतं. लोकं मरतात, पुन्हा राग उफाळून येतो, याचा मी दोनदा अनुभव घेतला. माझ्या आजीला मारलं, वडिलांना मारलं उद्या मलाही मारतील पण मी याला घाबरत नाही असंही राहुल गांधींनी ठणकावून सांगितलं.

 
राजस्थानमध्ये चुरू इथं झालेल्या सभेत राहुल यांनी भावनिक भाषण करुन पुन्हा एकदा जुन्या आठवणींना जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी इंदिरा गांधी यांची हत्या, राजीव गांधी यांचा मृत्यू या घटनेच्या प्रसंग त्यांनी सांगितला मला लहानपणी पालक आवडत नसे पण तरीही माझे वडील राजीव गांधी पालक खाण्यासाठी आग्रह करतं. पण माझी आजी माझ्या ताटातलं पालक आपल्या ताटात टाकून घेतं असे. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. त्यांना सगळे जण घाबरायचे पण मी घाबरत नव्हतो. आमच्या घरात माझे दोन-तीन मित्र होते. ते त्यांची सुरक्षा करायचे. सतवंत सिंह, केहर सिंह, बेअंत सिंह अशी त्यांची नाव होती.

 

1984 चा तो काळ होता. मी तेव्हा 14 वर्षांचा होतो. त्या दिवशी मी गार्डनमध्ये फिरत होतो. तेंव्हा मला बेअंत सिंह भेटले. त्यांनी मला विचारलं की, तुझी आजी कुठे झोपत असते?, त्यांच्या सुरक्षेत काही कमी आहे का? अशी प्रश्न मला विचारली. मी लहान होतो मला काही कळालं नाही. मी त्यांना उडत उडत उत्तर दिली. ते एवढ्यावर थांबले नाही जर कोणी एखादा बॉम्ब फेकला तर असं केलं पाहिजे, खाली असं झोपलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं पण मला ते काही कळालं नाही. नंतर ती गोष्ट मी विसरून गेलो. 14-15 वर्षानंतर या घटनेचा नीट विचार केला. दिवाळीच्या काळात माझ्या आजीवर बॉम्ब हल्ला करण्याचा सतवंत सिंह, केहर सिंह, बेअंत सिंह यांचा तो प्रयत्न होता. इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर काय घडले हे तुम्हाला माहित आहे.

 

मी शाळेत असताना असाच एक माणूस माझ्या शिक्षकेला भेटायला आला. त्याने काही तरी त्यांना सांगितलं त्यानंतर त्यांनी आम्हाला घरी जाण्यास सांगितलं. तेंव्हा प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये फोन आला. मी फोन उचलला, पलीकडून आमच्या घरी काम करणारी एक महिला जोरात किंचाळत होती. त्यावेळी माझे वडील बंगालमध्ये होते मी विचार माझे वडील ठीक आहे का? ती म्हणाली वडील ठीक आहे. मग मी विचारला आई ठीक आहे. तर तिने आईही ठीक असल्याचं सांगितलं. मग मी विचार केला वडील ठीक आहे. आई ठीक आहे तर मग आजीच असू शकते. मग मी तिला विचारलं आजी ठीक आहे का? तर तिने भेदरत नाही म्हणून सांगत घरी येण्यास सांगितलं आणि फोन ठेवून दिला. तेव्हा त्या प्रसंगाला मी कसा सामोरं गेलो, ते दुख काय होतं हे मलाच माहीत. त्यानंतर अशीच एक धक्कादायक घटना घडली ती माझ्या वडीलांच्या मृत्यूची. मी आणि प्रियंका घरी गेलो तेव्हा रस्त्यावर ज्या ठिकाणी आजीची हत्या झाली तिथे तिचं रक्त सांडलं होतं. तर दुसर्‍या रूममध्ये ज्याना मी मित्र मानत होतो, त्यांच्यसोबत खेळत होतो तेसतवंत सिंह, केहर सिंह, बेअंत सिंह यांचे मृतदेह पडलेले होते. मी त्या घटनेनंतर कित्येक वर्ष मनात राग धरून होतो. प्रचंड राग होता. राग येण्यासाठी काही मिनिटं लागतात पण राग संपवण्यासाठी कित्येक वर्ष लागतात.

भाजपवर हल्लाबोल
आज काही लोकप्रतिनिधी जनतेची माथी भडकवण्याचं काम करत आहे. त्यामुळे माझा भाजपच्या राजकारणाला विरोध आहे. ती लोकं फायद्यासाठी जनतेला जखमी करतात. मुझफ्फरनगरमध्ये दंगलीनंतर मी तिथे गेलो होतो. दंगलग्रस्तांनी भेट घेतली त्यांच्यात माझं दुख मी पाहत होतो. हा देश अखंड आहे तो अखंडच राहिला पाहिजे. पण ही लोकं मुझफ्फरनगरमध्ये दंगली घडवतील, गुजरात, काश्मीर,युपीमध्ये दंगली घडवतील. तेंव्हा आम्हालाच जाऊन ही आग विझवावी लागणार आहे. माझ्या आजीला मारलं, वडिलांना मारलं उद्या मलाही मारतील पण आपण त्याला घाबरतं नाही असं राहुल यांनी ठणकावून सांगितलं.

 

 • Pravin

  Please dont play politics of emotion. We youth want politics of governance and development.

 • Pravin

  I urge Rahul not to play politics of emotion. We youth want politics of development and good governance.

 • ashish

  if BJP is playing with us then wt abt u congrss.????

 • umesh jamsandekar

  राहुलजी तुम्ही जे दु:ख भोगलात ते साऱ्या देशाने भोगलेल आहे. तुमच्या आजीची हत्या झाली त्यावेळी तुम्हाला आठवत नसेल पण सारा देश पेटून उठला होता. तुमच्या वडिलांची हत्या झाली त्यावेळेसही सारा देश शोकाकुल झाला होता. त्या दोघांची राजकीय कारकीर्द महान होती. त्यांच्या काळात जे आज घडतंय ते कधीच घडल नसत आणि त्यांनी ते सहनही केल नसत. त्या दोघांची आठवण करून देवून भावनिक फसवणूक करू नका.त्यासाठी त्यांच्या उंची एवढ काम तुम्ही आणि तुमच्या मातोश्री यांनी केले आहे का याचा विचार करा. हा देश एवढा प्रामाणिक आणि सज्जन लोकांचा आहे कि तुमच्या आजीच्या आणि वडिलांच्या बलिदानाचा विसर त्यांना कधीही पडणार नाही. त्यांच्या बलिदानाची किंमत म्हणून लोकांनी तुम्हाला मत द्यावं अशी जर तुमची समज असेल तर ती चुकीची असेल. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान केले आहे पण त्या आधारावर आजपर्यंत त्यांच्या कुठल्याही वारसाने राजकीय अधिकार मागितलेला नाही ,आणि दुर्दैवाने त्यांना तो मिळाला सुद्धा नाही.ज्या खेडूत गरिबांच्या विकासाच्या गोष्टी आपण करीत आहात. त्यांच्या पूर्वजांनी देशाच्या स्वातंत्र्यात आपल सर्वस्व गमावलेल आहे. त्यांची कधी साधी आठवण आपण काढली आहे का ?त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन आपण केले का ?त्यांच्या कुटुंबाना मिळणारी पेन्शन वेळेवर मिळते कि नाही याची विचारपूस आपण कधी केली आहे का ?गेल्या ६० वर्षात अश्या किती कुटुंबातील लोकांना (गरीब)आपल्या राजकीय प्रवाहात सामील करून घेतलेत?तुम्ही म्हणता मी तुमच दु:ख माझ समजतो मग आपल्या मनाला विचारा कि इतकी वर्षे झाली तरी आमच्या सत्तेत हि दु;खी का राहिली. तेव्हा राहुलजी तुम्ही तुमच्या मेरिटवर पास व्हा. आणि तुमच्या कारकिर्दीत सरकारने केलेल्या चुकांची माफी मागा. कदाचित लोक तुमच्याकडे आदर्श म्हणून पाहतील.तुमची आजी स्व. इंदिरा गांधी आणि वडील स्व. राजीव गांधी यांच्या बद्धल या देशाला आदर आहे आणि त्यांचा इतिहास लोक विसरू शकणार नाहीत. जय – हिंद!!!

close