दिल्लीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हर्ष वर्धन, भाजपची घोषणा

October 23, 2013 2:49 PM0 commentsViews: 353

harsh vardha bjp23 ऑक्टोबर : भाजपनं दिल्लीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून डॉ. हर्ष वर्धन यांचं नाव निश्चित केलंय. पण भाजपनं हर्ष वर्धन यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे विजय गोएल यांना भाजपच्या प्रचाराची मुख्य धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे आणि बंडाची शक्यता फेटाळली आहे.

 

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत हर्ष वर्धन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विजय गोएल हे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. आपलं नाव जाहीर न केल्यास राजीनाम्याची धमकी ही त्यांनी दिल्याची चर्चा होती.

 

पण शीला दीक्षित यांच्यासमोर उभं करण्यासाठी भाजपला तुलनेनं स्वच्छ प्रतिमा असलेला नेता हवा होता. त्यामुळे हर्ष वर्धन यांना पसंती देण्यात आली. दरम्यान, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एक दिवस प्रचार करणार असल्याचं समजतंय.

close