एमसीए देणार सचिनला खास पेंटिंग भेट

October 23, 2013 1:56 PM0 commentsViews: 376

sachin painting23 ऑक्टोबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची अखेरची टेस्ट मॅच शानदार करण्यासाठी एम.सी.ए.नं जोरदार तयारी केलीय. यावेळी सचिनला एक खास भेट देण्यात येणार आहे. ती एका पेंटींगची..

 

सचिनला पेंटिंगची आवड असल्यानं एमसीएचे अध्यक्ष शरद पवारांच्या सूचनेवरून यासाठी नाशिकचे आतंरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रफुल्ल सावंत यांची निवड करण्यात आलीय.

 

सावंत यांची 10 चित्रं सचिनला दाखवण्यात आली आहेत. त्यातून सचिन त्याला आवडणार्‍या पेंटिंगची निवड करणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विविध 45 पुरस्कार सावंत यांना मिळाले आहे.

close