मुरलीचा नवा विश्वविक्रम

February 5, 2009 6:36 PM0 commentsViews: 6

5 फेब्रुवारी, कोलंबो टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 769 विकेट घेणार्‍या श्रीलंकेचा जादूई स्पिनर मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आता आणखी एक रेकॉर्ड जमा झालाय मुरलीधरननं वनडेत सर्वाधिक विकेट घेण्याच्या विक्रम आपल्या नावावर केलाय. मुरलीधरननं फक्त 328 वनडेत 503 विकेटचा टप्पा गाठलाय. या अगोदर हा रेकॉर्ड पाकिस्तानच्या वासिम अक्रमच्यानावे होता. अक्रमनं 356 वनडेत 502 विकेट घेतल्यात. मुरलीधरननं वनडेत सर्वाधिक विकेट घेण्याच्या विक्रम आपल्या नावावर केलाय. याअगोदर हा रेकॉर्ड पाकिस्तानच्या वासिम अक्रमच्यानावे होता. अक्रमनं 356 वनडेत 502 विकेट घेतल्यात. तर मुरलीधरननं फक्त 328 वनडेत 503 विकेटचा टप्पा गाठलाय. यात 30 रन्समध्ये सात विकेट घेण्याची त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. गौतम गंभीर त्याची विक्रमी विकेट ठरली वन डे आणि टेस्ट अशा दोन्हीमध्ये मुरलीधनरच्या नावावर आता 1271 विकेट जमा झाल्यायत.वन डे इतिहासात मुथय्या मुरलीधरन आणि वासिम जाफर या दोन बॉलरनीच 500 विकेट्सचा टप्पा गाठलाय. तिसर्‍या नंबरवर असलेल्या पाकिस्तानचा वकार युनुसच्या नावावर 416 विकेटची नोंद आहे. श्रीलंकेचा प्रमुख फास्ट बॉलर चामिंडा वास 400 विकेट घेत चौथा क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा शॉन पोलॉकच्या नावावर 393 विकेट्सची नोंद आहे.

close