कांद्याच्या किंमतीवरून ‘वांधा’ !

October 23, 2013 6:18 PM0 commentsViews: 202

Image img_140472_onion_240x180.jpg23 ऑक्टोबर : नाशिकच्या घाऊक बाजारात कांद्याचा लिलाव आज 3 हजार 900 रुपये क्विंटल म्हणजे 39 रुपये किलो या दरानं होतोय. त्यामुळे होलसेल आणि किरकोळ या भावातली ही दरी कशामुळे असा प्रश्न उपस्थित झालाय.

 

नवरात्रीत झालेल्या परतीच्या पावसामुळे नाशिकच्या बाजारत येणार्‍या नवीन कांद्यावरही परिणाम झालाय. लासलगाव बाजारात 700 ट्रॅक्टर ऐवजी अवघे शंभर दीडशे ट्रॅक्टर्स कांदा येतोय. कांदा शिल्लकच नसल्यानं त्याची साठेबाजी कशी करणार असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापार्‍यांचं म्हणणं आहे.

 

महाराष्ट्रातून कांद्याचा कमी पुरवठा का होतोय याची विचारणा केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा तसंच वाणिज्य मंत्रालयाकडून करण्यात आलंय. दिल्ली शहरात कांद्याच्या किरकोळ भाव कमालीचे वाढलेत. मात्र नाशिकपासून दिल्लीपर्यंत होलसेल भाव 50-55 च्या दरम्यान राहिलेत. नवरात्रीत झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिकच्या घाऊक बाजारात कांद्याची आवक कमी आहे. त्यामुळे होलसेलमधले कांद्याचे भाव चढे असल्याचं कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापार्‍यांचं म्हणणं आहे.

close