आयपॅड एयर लाँच

October 23, 2013 7:49 PM0 commentsViews: 635

02-apple-ipad-ipad-mini-macbook-launch-23101323 ऑक्टोबर : मोबाईल क्षेत्रात दादा कंपनी असलेल्या अ‍ॅपलने आपले दोन नवीन आयपॅड मोठ्या दिमाखात लाँच केलं. मंगळवारी सॅन फ्र ान्सिस्को इथं एका सोहळ्यात आयपॅड एयर आणि आयपॅड मिनी-2 लाँच केलेत. खास बाब म्हणजे आयपॅड एयरमध्ये 9.7 इंच रेटिना डिस्प्ले देण्यात आलाय तर मिनी 2 मध्ये 7.9 इंच रेटिना डिस्प्ले देण्यात आलाय.

 

तसंच या आयपॅडमध्ये वाय-फाय आणि सेल्युलर (3जी) सुविधाही देण्यात आलीय. हे दोन्ही मॉडल्स 16 जीबी, 32जीबी, 64जीबी आणि 128जीबी क्षमतेचे असणार आहे. एयर-आयपॉडच्या 16 जीबी वाय फायची किंमत 499 डॉलरपासून सुरु होते, तर 16 जीबी वाय फाय आणि सेल्युलर सोबत याची किंमत 629 डॉलर आहे.

 

आयपॅड मिनी 2 (फक्त 16 जीबी वाय फाय) 399 डॉलर इतकी आहे. यामुळे पूर्वीच्या आयपॅड मिनीचा भाव उतरला आहे. यासोबतच ‘मॅकबुक प्रो’चं अपडेटडं व्हर्जन लाँच करण्यात आलंय. या मॅकबुकला 15 इंच आणि 13 इंच स्क्रिन देण्यात आलीय. याची किंमत 1299 डॉलर इतकी आहे.

एयर-आयपॅड

- वजन 1 पाउंड
- 9.7 इंच रेटिना डिस्प्ले टच स्क्रिन
- स्टोरेज : 16 जीबी, 32जीबी, 64जीबी, आणि 128जीबी
- रंग : करडा-काळा आणि चंदेरी-पांढरा
- 16 जीबी वाय फायची किंमत 499डॉलर, तर 16 जीबी वाय फाय आणि सेल्युलर सोबत याची किंमत 629 डॉलर
आयपॅड मिनी 2
- वजन 0.73 पाउंड
- 7.9 इंच रेटिना डिस्प्ले टच स्क्रिन
- स्टोरेज : 16 जीबी, 32जीबी, 64जीबी, आणि 128जीबी
- रंग : करडा-काळा आणि चंदेरी-पांढरा
- 16 जीबी वाय फायची किंमत 399 डॉलर
 

close