26/11चे दहशतवादी पाकिस्तानीच

February 5, 2009 2:18 PM0 commentsViews: 4

5 फेब्रुवारी मुंबईरवींद्र आंबेकरकसाब आणि मुंबई हल्ल्यातले इतर सर्व दहशतवादी पाकिस्तानीच असल्याचा आणखी एक पुरावा भारताला मिळाला. कसाबसह नऊ दहशतवाद्यांच्या डीएनएचे नमुने पुरावे मुंबई पोलिसांना मिळाले आहेत. हे नमुने कुबेर बोटीत सापडलेल्या सामानाशी मिळतेजुळते आहेत. कुबेर बोटीचं अपहरण करून अतिरेकी त्यातूनच मुंबईला आले होते. या बोटीत अतिरेक्यांनी वापरलेले 16 जॅकेट, टूथ पेस्ट, ब्रश, कपडे तसंच इतर सामान मिळालं होतं. त्या वस्तू फॉरेन्सिक टेस्टसाठी पाठवल्या होत्या. या वस्तूंना लागलेला घाम आणि अतिरेक्यांच्या घामाचे डीएनएचे नमुने सारखेच आहेत. त्यामुळे हे अतिरेकी पाकिस्तानचेच असल्याचं सिद्ध होतं आहे. आणि या वस्तूंचे कुबेर बोटीवरचे पुरावे नष्ट करण्याचा त्यांच्या म्होरक्याचा आदेश पाळायला दहशतवादी विसरले. आणि इथंचं ते फसले. मुंबई हल्ल्यातील दहा दहशतवाद्यांनी कुबेरवरचे अमरसिंग तांडेल तसंच त्यांच्या साथीदारांची हत्या केली. त्यानंतर त्यांना बोट नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण त्यांची चूक त्यांना महागात पडली. मुंबई पोलिसांना कुबेरवर साधारण 16 जॅकेट,टूथ पेस्ट, ब्रश,दहशतवाद्यांनी वापरलेले कपडे तसचं इतर सामान मिळालं. या सगळ्याचा तपास केल्यानंतर या वस्तू डीएन टेस्टसाठी पाठवल्या. आणि आता त्या वस्तू दहशतवाद्यांच्याचं असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान न्यायवैद्यक प्रयोगशाळेनं जे दहा सॅम्पल घेतले होते, त्यांचे नमुने एकसारखे असल्याच्या मुद्याला गृहमंत्री जयंत पाटील यांनीही पुष्टी दिली आहे.

close