दोषी सोनोग्राफी सेंटर्सवर कारवाई करण्यास टाळाटाळ !

October 23, 2013 9:23 PM2 commentsViews: 181

सिद्धार्थ गोदाम,औरंगाबाद
23 ऑक्टोबर : गर्भलिंगनिदान आणि स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधात सरकार अनेक मोहिमा जाहीर करतंय. पण, कायद्याची कठोर अंमलबजावणीच केली जात नाहीये. औरंगाबाद जिल्ह्यातील दोषी सोनोग्राफी सेंटर्सवर कारावाई करण्यास जिल्हा आरोग्य उपसंचालक विभाग टाळाटाळ करतंय. इतकचं नाही, तर नियमानुसार धडक मोहीम राबवली जात नसल्यानं सोनोग्राफी सेंटर्सवर जिल्हा आरोग्य विभागाचा वचक नसल्याचं चित्र आहे. पैठणमधल्या देवगिरी सोनोग्राफी सेंटरमध्ये ‘सर्रास प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान केलं जातं, असा स्पष्ट उल्लेख वैद्यकीय अधिक्षकांच्या अहवालात आहे. पण या सेंटरवर काहीही कारवाई झाली नाहीये.

जिल्हा आरोग्य उपसंचालकांना हा अहवाल सादर करण्यात आलाय. मात्र, या सेंटरचे मालक डॉ. दिपेश चेमटे यांनी हे आरोप फेटाळलेत. या प्रकरणी दिपेश चेमटे यांची चूक असूनही आरोग्य उपसंचालक त्यांच्यावर कारवाई करत नाहीयेत. सोनोग्राफी रिपोर्ट न लिहिताच त्यावर सही करणं हा प्रकार पीसीपीएनडीटी (PCPNDT)च्या विरोधात आहे.

पैठण इथलं देवगीरी सोनोग्राफी सेंटर..या सेंटरबद्दलचा हा अहवाल बघा !

‘सर्रास प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान केलं जातं, असा स्पष्ट उल्लेखच वैद्यकीय अधिक्षकांनी, जिल्हा आरोग्य उपसंचालकांना दिलेल्या अहवालात केलाय. देवगीरी सेंटरचे मालक दिपेश डॉ.चेमटे यांच्या विरोधात आलेल्या तक्रारींवरून वैद्यकीय अधीक्षक अंजली देशपांडे यांनी सेंटरवर छापा मारून तपासणी केली. तपासणीत रूग्णाचं संमतीपत्र आणि जाहीर निवेदन यावर सोनोग्राफी रिपोर्ट न लिहिता त्यावर डॉ.चेमटे यांच्या सह्या केल्याचं आढळून आलं. ही अनियमितता गर्भधारणापुर्व व प्रसव निदानतंत्र अधिनियमाच्या म्हणजेच पीसीपीएनडीटी च्या विरोधात आहे.

गर्भधारणापुर्व व प्रसवपुर्व निदानतंत्र अधिनियमानूसार सोनोग्राफी करण्यापूर्वी रूग्ण महिलेचा पूर्ण तपशील ‘एफ’ फार्म मध्ये भरला पाहिजे. एफ फार्म न भरता सोनोग्राफी केली, की गर्भलिंगनिदान केल्याचा पुरावाच मागे उरत नाही. नियम धाब्यावर बसवून नेमकं हेच केलं जातंय. रुग्ण महिलेची माहिती न भरता सोनोग्राफी केली जाते. अचानक भरारी पथक आलं तर,आधीच डॉक्टारांची सही, शिक्का असलेल्या ‘एफ’ फार्म वर रूग्णाचं नाव व संमती लिहिली जाते. पण, भरारी पथक आलं नाही तर,गर्भलिंगनिदानासाठी सोनोग्राफीचा वापर केला जातो. पण, डॉक्टरांनी मात्र, हे आरोप फेटाळलेत.

वैद्यकीय अधिक्षकांच्या अहवालानूसार कोरं संमतीपत्र आढळणार्‍या सोनोग्राफी सेंटर्स वर पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 23 नूसार कारवाई व्हायला हवी होती.

वैद्यकीय अधिक्षकांनी दीड वर्षापूर्वी जिल्हा आरोग्य उपसंचालकांना तसा अहवाल सादर केलाय. डॉ.चेमटेंनी ही चूक कबूल करून माफीचा खुलासा दिलाय.मात्र उपसंचालक या प्रकरणी कारवाईच करत नाही.

औरंगाबादेत 244 सोनोग्राफी सेंटर्स आहेत. राज्य सरकारच्या आदेशानूसार महिन्यातून दोन धडक तपासण्या केल्या गेल्या पाहिजेत. औरंगाबाद उपसंचालक विभागाने मात्र, अद्याप एकही धडक मोहीम हाती घेतली नाहीये.

  • Ravi Gadgil

    Congratulations for defaming a doctor without concrete evidence. Filling incomplete f form & NOT performing sonography is NOT an offense. Deputy Director H S [Upsanchalak} is NOT appointed as Appropriate Authority u/s17[2] of PCPNDT act by State Govt & has No powers.

  • Ravi Gadgil

    Maharastra Govt has appointed Civil Surgeon at District level Sperintedent Ruural Hospital at Taluka Level Mediacl officer Health in Corporation areas Additional Director at State Level. Deputy Director is NOT appointed as A A by any Gazette Notification If anybody has any complaint of violation of the act complain to website http://www.AmchiMulgi.com State level team will investigate & file a case If they find grounds to do so.Every case u/s of the act is cognisable nonbailable noncompoundable .Doctor looses his Registration on mere framing of charges! Any allegation made publicly ruins a doctors life There are NO rules for any so called STING operations Any lady can stand in witness box & say that so & so doctor told sex of my child.This has given rise to rackets of Extortion which everybody knows about!Do not defame anybody without concrete evidence!

close