अखेर पुण्याच्या महापौरांकडे 5 कोटींचा निधी उपलब्ध

October 23, 2013 10:18 PM0 commentsViews: 329

pune muncipal corporation23 ऑक्टोबर : पुण्याच्या महापौरांना खर्च करण्यासाठी अखेर 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. स्थायी समितीने महापौर निधीसाठी या निधीची तरतूद केली आहे.

 

आधीच्या महापौर वैशाली बनकर यांनी अवघ्या पाच महिन्यांमध्ये उपलब्ध असलेला सगळा निधी अवघ्या पाच महिन्यांमध्ये खर्च केल्यामुळे नव्या महापौर चंचला कोद्रे यांना पुढच्या सात महिन्यांसाठी निधीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

 

त्यामुळे महापौरांनी निधीची तरतूद केली जावी अशी मागणी स्थायी समितीकडे केली होती. त्यानंतर स्थायी समितीने हा निधी मंजूर केला आहे. निधी मंजूर झाला असला तरी आधीच्या महापौरांनी हा निधी नेमका कसा आणि कुठे खर्च केला याची माहिती घेण्याची तसदीही स्थायी समितीने घेतलेली नाही.

close