पुन्हा ‘हसवाफसवी’

October 23, 2013 11:08 PM0 commentsViews: 368

hasava fasvi23 ऑक्टोबर : मराठी रंगभूमीवरील एक गाजलेलं नाटक म्हणजे हसवाफसवी. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या लेखणीतून साकारलेलं हे लोकप्रिय नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येतंय.

 

प्रभावळकरांनी रंगवलेल्या 6 अजरामर भूमिका आता रंगमंचावर साकारणारे अभिनेता पुष्कर श्रोत्री. येत्या 27 तारखेला पुण्यात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे. या नाटकाचं दिग्दर्शन करतायत चंद्रकांत कुलकर्णी.

 

1991 ला रंगमंचावर आलेल्या या नाटकाला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. बदलत्या काळानुसार या 6 वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बारीकसे बदल करून हे नाटक रसिकांसमोर येणार आहे. दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर हे या नाटकाचे निर्माते आहेत.

close