श्रीलंकेसमोर 333 धावांचं आव्हान

February 5, 2009 2:37 PM0 commentsViews: 4

5 फेब्रुवारीकोलंबोमध्ये श्रीलंकेविरुध्द सुरु असलेल्या चौथ्या वनडेत भारतानं पुन्हा एकदा तीनशे रन्सचा टप्पा पार केला आहे. गौतम गंभीरनं फटकेबाजी करत दीडशे रन्स केले. तर कॅप्टन महेंद्रसिंग धोणीची सेंच्युरी अवघ्या सहा रन्सनं हुकली. भारत आणि श्रीलंके दरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या वन डे मॅचमध्ये धोणी आणि गौतम गंभीर यांनी केलेल्या सेंच्युरी पार्टनरशिप नंतर भारताच्या तीन विकेट्स झटपट गेल्या. कॅप्टन धोणीची सेंच्युरी सहा रन्सनी हुकली. जयसूर्याच्या बॉलिंगवर फर्नांडोकडे कॅच देऊन तो आऊट झाला. पण त्यापूर्वी गंभीर बरोबर दुस-या विकेटसाठी त्याने 188 रन्सची पार्टनरशिप केली. तो आऊट झाल्यावर मात्र युवराज सिंग आणि युसुफ पठाण झटपट आऊट झाले. पठाण तर शून्यावर आऊट झाला. भारताने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. सेहवागने इनिंगची सुरुवातही खणखणीत फोर मारून केली. पण कुलसेखराच्या बॉलिंगवर अप्रतिम कॅच घेत जयसूर्याने त्याची इनिंग संपवली. सेहवागने पाच रन्स केले. सेहवाग आऊट झाल्यावर कॅप्टन धोणी वन डाऊन खेळायला आला होता.

close