ज्येष्ठ गायक मन्ना डे यांचं निधन

October 24, 2013 2:21 PM0 commentsViews: 272

manna de24 ऑक्टोबर : संगीताच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार, पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कारने गौरवण्यात आलेले ज्येष्ठ पार्श्वगायक मन्ना डे यांचं निधन झालंय. ते 94 वर्षांचे होते. बेंगळुरूमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते फुप्फुसाच्या संसर्गानं आजारी होते. बंगळुरूच्या रवींद्र कला क्षेत्र इथं त्यांचं पार्थिव दुपारी 12 वाजेपर्यंत अंतिम दर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 12.45 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

 

मृत्यूच्या वेळी त्यांची मुलगी आणि जावई जवळ होते. मन्ना डे यांची कारकीर्द ही हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाबरोबरच बहरली. 1943 साली त्यांनी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी हिंदीसह, बंगाली, मराठी आणि इतरही भाषांमध्ये गाणी गायली होती.

 

मोहम्मद रफी, मुकेश आणि किशोर कुमार हे त्रिकूट हिंदी सिनेसंगीतावर राज्य करत असतानाच मन्ना डे यांनी आपलं स्थान निर्माण केलं होतं. साडेतीन हजारांच्यावर त्यांनी गाणी गायली आहेत. किशोर कुमार यांच्यासोबतचं त्यांचं पडोसनमधलं एक चतुर नार हे त्यांचं सगळ्यांत गाजलेलं गाणं. पद्मभूषण, पद्मश्रींसह अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले.

===============================================================
मन्ना डे यांचा अल्प परीचय

 • 1 मे 1919 रोजी जन्म
 • 3500हून जास्त गाण्यांचं रेकॉर्डिंग
 • उस्ताद अमन अली खान, उस्ताद अब्दुल रहमान खान यांच्याकडे शिक्षण
 • हिंदुस्तानी क्लासिकल संगीताचं शिक्षण
 • पहिला सिनेमा – तमन्ना ( 1943)

===============================================================
- सलाम मन्नादांना
पद्मश्री – 1971
पद्मभूषण – 2005
राष्ट्रीय पुरस्कार – 1969, 1971
लता मंगेशकर ऍवॉर्ड – 1985
दादासाहेब फाळके पुरस्कार – 2007

 

=============================================================
महत्त्वाचे पार्श्वगायन केलेले सिनेमे

 • तमन्ना 1943
 • ज्वारभाटा – 1944
 • आवारा – 1951
 • परिनिता – 1953
 • बूटपॉलिश – 1954
 • श्री 420 – 1955
 • सीमा 1955
 • चोरी चोरी – 1956
 • दो आँखे बारह हाथ – 1957
 • नवरंग – 1959
 • बरसात की रात – 1960
 • काबुलीवाला – 1961
 • चित्रलेखा – 1964
 • वक्त – 1965
 • लव्ह इन टोकियो – 1966
 • तिसरी कसम – 1966
 • उपकार – 1967
 • रात और दिन – 1967
 • मेरा नाम जोकर – 1970
 • आनंद – 1971
 • शोले- 1975
 • अमर अकबर अँथनी- 1977
 • लावारिस-1981
 • प्रहार – 1990

=============================================================================

close