दिल्लीकरांना महाराष्ट्र पुरवणार स्वस्तात कांदा

October 24, 2013 2:51 PM0 commentsViews: 288

Image img_140472_onion_240x180.jpg24 ऑक्टोबर : कांद्याने दिल्लीकरांच्या डोळ्यात पाणी आणलंय आता दिल्लीकरांच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याची स्वस्तातली जबाबदारी महाराष्ट्रावर आलीय. कांद्याच्या प्रश्नी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी आज केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेतली.

 

कांद्यावर तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर, नाशिक,कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून 8 हजार क्विंटल कांदा खरेदी करणार असल्याची माहिती शीला दीक्षित यांनी दिलीय. तसंच दिल्लीतल्या अधिकार्‍यांचं पथक नाशिकबरोबरच पुण्यालाही भेट देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

 

आज दुपारी 2 वाजता दिल्लीचं पथक नाशिकला पोहचले आहे. दुपारी 3 वाजता ते नाशिकच्या जिल्हाधिकार्‍यांना भेटणार आहेत.

 

दरम्यान, 1 ते 2 महिन्यात कांद्याचा अतिरिक्त पुरवठा होईल आणि कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून कमी दराची तक्रार येईल असं शरद पवार यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचं परतीच्या पावसामुळे नुकसान झालंय, केंद्राकडून नुकसान भरपाईसाठी 921.98 कोटींची मदत करण्यात येणार असल्याचं आश्वासनही शरद पवार यांनी दिली आहे.

close