हॉस्पिटलला दणका, 5.96 कोटींची भरपाई देण्याचे आदेश

October 24, 2013 1:13 PM0 commentsViews: 605

kunal saha24 ऑक्टोबर : कोलकता येथील कुणाल साहा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. कोलकात्यामधल्या 15 वर्ष जुन्या या प्रकरणामध्ये एएमआरआय हॉस्पिटलला 5 कोटी 96 लाख रुपये इतकी विक्रमी भरपाई देण्याचा आदेश दिलाय. हे प्रकरण 15 वर्षं जुनं आहे.

 

डॉ. अनुराधा साहा या भारतात आल्या असताना त्यांना कोलकात्यामधल्या एएमआरआय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळेच आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे पती कुणाला साहा यांनी केला होता.

 

त्याविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. साहा यांना आधी 1 कोटी 72 लाख रुपये इतकी भरपाई देण्यात यावी असा आदेश आधी देण्यात आला होता. आता तो एक कोटीवरुन 5 कोटी करण्यात आलाय.

 
 सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

  • - कुणाल साहा वैद्यकीय निष्काळजीपणाचं प्रकरण
  • - कोलकात्यातल्या AMRI हॉस्पिटलला 5.96 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश
  • - मे 1998 मध्ये कुणाल साहा यांच्या पत्नीचा हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे झाला होता मृत्यू
  • - भरपाईची रक्कम 1.72 कोटीवरून 5.96 कोटी वाढवली
close