CM असताना क्षणात निर्णय घेत होतो,राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

October 24, 2013 3:35 PM1 commentViews: 1779

rane on cm24 ऑक्टोबर : माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत क्षणात निर्णय घेत होतो,उद्या नाही असं म्हणत उद्योगमंत्री नारायण राणे पक्षाला घरचा अहेर देत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. मी फायलींवर पटापट निर्णय घ्यायचो, चर्चा करा असं फायलींवर लिहीत नव्हतो. असंही राणे म्हणालेत.

 

बुधवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. हल्ली प्रशासनात तक्रार करणे, काम टाळणे या वृत्तीचे लोक वाढत आहेत. सरकारी अधिकार्‍यानं भावनेच्या भरात काम करू नये, त्याला कर्तव्य आणि जबादारीची जाणीव पाहिजे असंही राणे यांनी म्हणाले.

 

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फाईलीवरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. पवारांच्या या टीकेमुळे आघाडीत चांगलीच बिघाडी झाली होती. आता तर खुद्द काँग्रेस पक्षाचे नेते नारायण राणे यांनी आपल्याच मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

  • dnyanoba kharat

    माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत क्षणात निर्णय घेत होतो,उद्या नाही
    असं म्हणत उद्योगमंत्री नारायण राणे पक्षाला घरचा अहेर देत
    मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

close