राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी लढण्यास आठवलेंचा नकार

October 24, 2013 3:05 PM0 commentsViews: 1099

Image ramdas_athavale_300x255.jpg24 ऑक्टोबर : राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी आम्ही मागणी केली नाही. आम्ही एक राज्यसभेची आणि 3 लोकसभेच्या जागेची मागणी केलीय. जर सातवी जागा द्यायची असेल तर त्याचा निर्णय उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांनी घ्यावा. उगाच सातव्या जागेवर उभं राहुन एखादा उमेदवार उभा राहिला तर अडचण होईल त्यामुळे रिस्क कशाला घ्यायची असं सांगत सातव्या जागेस आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला.

 

पण सहावी जागा दिली तर नक्की विचार करु असंही आठवले म्हणाले. मनोहर जोशींना शह देण्यासाठी रामदास आठवले यांना महायुतीमध्ये सातव्या जागेसाठी राज्यसभेत उतरवण्याची चर्चा सुरू झालीय. पण रामदास आठवले यांनी मात्र आपण सातवी जागा लढवणार नसल्याचं आयबीएन लोकमतकडे स्पष्ट केलंय.

 

राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेनेनं एक नवी खेळी खेळली. राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी रामदास आठवलेंना उभ करून मनोहर जोशी यांना एक प्रकारे शह देण्याचा प्रयत्न होता. यासाठी मिलिंद नार्वेकर आणि रामदास आठवले यांच्यात चर्चा झाली. पण नार्वेकर यांच्याशी महायुतीत बाबत चर्चा झाली सातव्या जागेबाबत चर्चा झाली नाही असंही आठवलेंनी स्पष्ट केलं.

close