शिवसेनेचा निवडणूक प्रचार विदर्भातून सुरू

February 5, 2009 2:44 PM0 commentsViews: 4

5 फेब्रुवारी, अमरावती शिवसेनेनं लोकसभेच्या निवडणूक प्रचाराला विदर्भातून सुरुवात केलीये. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौर्‍यावर आहेत. त्यांनी अमरावतीसभा घेतली. शेतकर्‍यांची कर्जमाफी, लोडशेडिंग हे शिवसेनेचे निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या संघटनात्मक बदल, स्थानिक उमेदवारांची मागणी, पक्षांतर्गत गटबाजी ही शिवसेनेपुढं विदर्भात मोठी आव्हानं असणार आहेत. हेच उद्धव ठाकरे यांनी अमरावतीतल्या सभेत सांगितलं.

close