सचिनने रिक्रिएशन सेंटरच्या नावाचा प्रस्ताव नाकारावा,AAPची मागणी

October 24, 2013 6:26 PM0 commentsViews: 578

aap letter 4424 ऑक्टोबर : एकीकडे सचिन तेंडुलकरला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे तर दुसरीकडे सचिनचं नाव कांदिवली रिक्रिएशन सेंटरला देण्यावरुन राजकारण सुरू झालंय. कांदिवलीतील महावीर नगरात रिक्रिएशन सेंटरला सचिनचं नाव देण्याचा ठराव एमसीएनं केलाय. पण हा प्रस्ताव सचिनने नाकारावा असं पत्र आम आदमी पार्टीचे सदस्य मयांक गांधींनी सचिनला लिहिलंय.

 

सचिनची कारकीर्द खूप मोठी आहे. तो अनेक चाहत्यांच्या गळ्यातला ताईत आहे. पण ज्या रिक्रिएशन सेंटरला सचिनचं नाव देण्यात आलं त्याचं बांधकाम भ्रष्टाचारावर आधारीत आहे. या रिक्रिएशन सेंटरसाठी लहान मुलांच्या खेळाचं मैदान हडप करून त्यावर हे सेंटर उभारण्यात आलंय. तसंच यासाठी 3000 हजार लोकांना 9 लाख रुपयात सदस्य दिलंय तब्बल 270 कोटींचा घोटाळा आहे असा आरोप गांधी यांनी केलाय.

 

या विरोधात आम्ही जनहित याचिका दाखल केलीय. पण अशा भ्रष्टाचारातून उभे असलेल्या सेंटरला सचिनचं नाव देऊ नये आणि सचिननेही आपलं नाव मागे घ्यावं अशी मागणी गांधी यांनी केली. या अगोदरही शिवसेनेनंही एमसीएच्या ठरावाला विरोध केलाय. एमसीएच रिक्रिएशन सेंटर पालिकेच्या भूखंडावर आहे. त्यामुळे त्याला नाव देण्याचा अधिकार पालिकेला आहे, असं शिवसेनेनं म्हटलंय.  एकंदरीतच सचिनला निरोप देण्यासाठी सर्वत्र जड पावलानं तयारी सुरू आहे. पण या पलीकडे जाऊन राजकीय पक्षांनी बॅटिंग सुरु केली.

close