कोल्हापुरात स्त्री-भ्रूण हत्या, बोगस डॉक्टर अटकेत

October 24, 2013 6:54 PM0 commentsViews: 317

24 ऑक्टोबर : कोल्हापूरमध्ये एका बोगस डॉक्टरने महिलेचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी गांधी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बोगस डॉक्टर शकुंतला यादव हिला अटक केलीय तर इतर दोन आरोपी फरार आहे. कोल्हापुरातील उचगावात मोलमजुरी करणार्‍या एका महिलेचा गर्भपात करण्यात आला. तिचा गर्भ स्त्री जातीचा होता, असं सिव्हिल सर्जन आर. सी. चौगुले यांनी सांगितलं. या महिलेची प्रकृतीही गंभीर असल्याचं चौगुले यांनी सांगितलं. त्यांनीच याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानंतर या महिलाचा गर्भपात करणारी बोगस डॉ. शकुंतला यादव हिला अटक झालीय. पण, इतर दोन आरोपी फरार आहेत.

close