भाजपचं राजकारण उद्योगपतींचं -राहुल गांधी

October 24, 2013 7:11 PM0 commentsViews: 431

rahul on bjp424 ऑक्टोबर : भाजपचं राजकारण हे निवडलेल्या लोकांचं राजकारण आहे. त्यांचं राजकारण उद्योगपतींचं राजकारण आहे अशी घणाघाती टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

 

तसंच मध्यप्रदेशातील जनता ही इंडिया शायनिंगच्या राजकारणाला बळी ठरलीय. विकास विकासच्या नावाने गाजावाजा करणार्‍या या भाजपला लोकांच्या भावना समजत नाही अशी टीकाही राहुल यांनी केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचाराचा धडाका लावलाय.

 

आज ते मध्यप्रदेशच्या दौर्‍यावर होते. सागरमध्ये झालेल्या रॅलीत त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्ला केला. केंद्र सरकारनं आणलेल्या अन्नसुरक्षा कायद्यामुळे आता कोणीही भुकेलं राहणार नाही असा विश्वासही राहुल यांनी व्यक्त केला.

close