फहीम अन्सारीच्या पोलीस कोठडीत वाढ

February 5, 2009 6:30 PM0 commentsViews: 2

5 फेब्रुवारी मुंबईमुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यासाठी अतिरेक्यांना मदत करणा-या संशयित फहीम अन्सारीला 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. उत्तरप्रदेशमधल्या रामपूर सीआरएफमध्ये 2006 साली स्फोट केल्याप्रकरणी फहीमवर रामपूरला खटला सुरू आहे. मुंबईवरच्या हल्ल्यासाठी लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत येणार असल्याची माहिती फहीमला होती. त्यासाठी आवश्यक ते नकाशेही त्याच्याकडे सापडल्याची पोलिसांची माहिती आहे. तसंच दहशतवाद्यांना या प्रवासासाठी त्याने मदतही केली असल्याचा संशय आहे. फहीमचा साथीदार शहाबुद्दीन अहमद यालाही 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुंबईच्या किल्ला कोर्टानं दिले आहेत.

close