फेसबुक वापरू दिलं नाही म्हणून तरूणीची आत्महत्या

October 24, 2013 8:18 PM0 commentsViews: 4217

24 ऑक्टोबर : आई-वडिलांनी फेसबुक वापरू दिले नाही म्हणून परभणीमध्ये एका तरुणीनेआत्महत्या केल्याची घटना घडलीय. ऐश्वर्या दहिवाळ (वय 17) असं या मुलीचं नाव आहे. आईवडिलांनी फेसबुक, मोबाईल वापर करू दिला नाही म्हणून ऐश्वर्याने गळफास लावून आत्महत्या केलीय. आईवडिलांनी आपल्यावर निर्बंध घातले म्हणून हे कृत्य करत असल्याचं तिनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलंय. परभणी इथं राहणारी ऐश्वर्याही पॉलिटेक्निकला शिकते. आत्महत्येपूर्वी ऐश्वर्याने चिट्ठी लिहून ठेवली होती. ज्या घरात इतकी बंधन आहे तिथे मला राहण्याची इच्छा नाही. फेसबुक वापरणं म्हणजे खूप मोठा गुन्हा नाही. मला घरच्यानी फेसबुक वापरू दिले असतं तर मी मोबाईलवर उघडलं नसतं. पण मला असं करू दिलं नाही म्हणून मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असं सांगून ऐश्वर्याने आपली जीवनयात्रा संपवली. ऐश्वर्याचा आत्महत्येमुळे परभणीत हळहळ व्यक्त होतं आहे.

close