तिसर्‍या आघाडीमुळे देशाला स्थैर्य मिळेल -शरद पवार

October 24, 2013 11:00 PM1 commentViews: 1766

sharad pawar on rahul24 ऑक्टोबर : एक प्रशासक म्हणून राहुल गांधी यांनी अगोदर आपली पात्रता सिद्ध करून दाखवावी असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शर पवार यांनी राहुल यांना लगावला. तसंच येणार्‍या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांना बायपास करता येणार नाही. त्यांचा आधार घेण्याची परिस्थिती आता निर्माण झालीय. उद्या निवडणुका झाल्यात तर काँग्रेस प्रादेशिक पक्षांना पाठिंबा देऊ शकते किंवा प्रादेशिक पक्षांना पाठिंबा द्यावा लागेल.

 

जर अशी आघाडी अस्तित्वात आली, तर चांगलंच होईल. त्यामुळे देशाला स्थैर्यही मिळू शकतं, असं म्हणून पवारांनी काँग्रेसला सूचक इशारा दिलाय. सीएनएन आयबीएन आणि आयबीएन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपली परखड भूमिका मांडली.

 
‘कांद्याची भाववाढ हा निसर्गाचा कोप’
कांद्याची भाववाढ हा निसर्गाचा कोप आहे. अतिवृष्टीसारख्या कारणांमुळे ही भावाढ झालीये. तर नोव्हेंबरमध्ये जास्त माल येईल तशा या किंमती पुन्हा कमी होतील असंही शरद पवारांनी स्पष्ट केलंय. तसंच मीडिया आणि लोकांच्या नाहक दबावाखाली येऊन खाद्यान्नाच्या आयात-निर्यातीच्या धोरणांमध्ये वारंवार बदल केले जातात, असा गौप्यस्फोटही पवारांनी केला. या धरसोड वृत्तीमुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांचंही नुकसान होतं, असं पवारांनी म्हटलंय.

 

‘सभेच्या गर्दीच मतात रुपांतर होत नाही
सभेला गर्दी होते, याचा अर्थ त्याचं मतात रुपांतर होतंच असं नाही. या अगोदरही वाजपेयी यांच्या अनेक सभांना प्रचंड गर्दी असायची. लोक येतात नवीन कुणी भूमिका मांडत आहे ते ऐकण्यासाठी येतात पण याचा असा अर्थ नाही की, याचं मतात रुपांतर होतं असं काहीही नाही असी टीका पवारांनी नरेंद्र मोदींचं नाव न घेता केली.

 
‘राहुल गांधींनी पात्रता सिद्ध करावी

आम्ही यूपीए सरकारमध्ये घटक पक्ष जरी असलो तरी त्यांचा निर्णय हा आमचा निर्णय असं काही नाही. राहुल गांधी यांनी एक प्रशासक म्हणून आपली पात्रता सिद्ध करून दाखवावी. उपाध्यक्ष होण्याअगोदर राहुल यांनी मनमोहन सिंग सरकारमध्ये सहभागी व्हायला हवं होतं. पण त्यांनी तसं केलं नाही असं मत पवारांनी व्यक्त केलं. पण राहुल हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील याबद्दल उत्तर देण्यास पवारांनी टाळलं. तसंच येणार्‍या निवडणुकीत भाजप असो अथवा काँग्रेस असो कोणत्याही एका पक्षाच सरकार येणं जरा अवघड आहे. भाजपच्या काही जागा वाढतील, काँग्रेसच्या काही वाढतील पण सत्तेवर येण्यासाठी कोणत्याही पक्षाला प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा घ्यावाच लागले. एखाद्यावेळेस परिस्थिती असी असेल की, प्रादेशिक पक्षांनाच पाठिंबा द्यावा लागेल असं भाकितही पवारांनी वर्तवलं.

  • Deepak Chavan

    आता हि कुरण साहेबांनी NCP च्या गुरांसाठी राखीव ठेवलीत.. या चरा…लुटा…पैसा कामाव अंनि परत निवडण या अंनि मला साबेह म्हणा , सत्ता द्या …. कांदा भाव वाढ कशी होते, कुणाच्या इच्छेने होते, हालत बिघडवायची ते खायचं, मंग वरून package आणायचं ते गिळायच… कुठे तरी थांबवा नाही तरी शेवट खूप वाईट होईल साहेब.. टोल, IPL , सहकार क्षेत्र, जमिनी, तेलगी झाला, लव्हासा झाल, गहू पण खादाडला …पाउस आला म्हणून पाच्कागे अन्णून लुटलं, नव्हता म्हणून अन्णून लुटलं……दादल पोसालेत ह्या maharastran आणि वरून जनता राजा म्हणायचं… लोक अंनि मेडिया पण किती लाचार असतो ह्या पवारच्या पावर game पुढी…ह्याचा अंत जवळ आलाय अंनि सडका गहू अंनि आपण खूप फरक नाही राहणार…खूप लोकांची हाय लागणार अह्हे..

close