पोस्टाच्या पाकिटावर सचिनचा फोटो !

October 25, 2013 4:08 PM0 commentsViews: 520

Image sachin34634_300x255.jpg25 ऑक्टोबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची निवृत्ती शानदार व्हावी यासाठी सध्या सर्वच स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणजे सचिनचा फोटो असलेलं पोस्टाचं पाकिट काढण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

 

याबाबतचा प्रस्ताव आणि सूचना दळणवळण मंत्रालयाकडे आल्या असून त्याची चाचपणीही मंत्रालयानं सुरू केलीय. पोस्ट खात्याकडे सध्या लोकांचं दुर्लक्ष होतंय. या उपक्रमांमुळे पुन्हा लोकांचं लक्षं वळवता येईल असा विचार सरकार करतंय.
ईडन गार्डनच्या मॅचच्या तिकिटांवर सचिन
सचिनची 199 टेस्ट कोलकात्यामधल्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. त्या निमित्तानं क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल विशेष तिकिटं काढणार आहे. कोलकात्यामधले चित्रकार जोगन चौधरी यांनी काढलेलं सचिनचं चित्र या तिकिटांवर छापण्यात येणार आहे. तसंच सचिननं ईडन गार्डनवर ठोकलेल्या 3 शतकी खेळींचे फोटोही त्यावर असतील.
फोर्स इंडियाकडून सचिनला सलामी
सचिनच्या निवृत्तीसाठी एफ-1 (F-1) टीम सहारा फोर्स इंडियानंही खास योजना आखली आहे. या रविवारी होणार्‍या इंडियन ग्राँ प्रीसाठी फोर्स इंडियाच्या गाडीवर सचिनचा हॅशटॅग वापरण्यात येणार आहे. कारच्या पुढच्या भागावर हा हॅशटॅग वापरण्यात येईल. सचिन तेंडुलकर F1 चा मोठा फॅन आहे. 2011 च्या इंडियन ग्रांप्रीच्या उद्घाटनावेळी सचिन उपस्थित होता. त्यामुळे मास्टर ब्लास्टरला सलाम करण्यासाठी फोर्स इंडियाची ही योजना आहे.

close