पुण्यात मनसेची गांधीगिरी

February 5, 2009 6:38 PM0 commentsViews: 6

5 फेब्रुवारी पुणे सागर शिंदेमहाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत होत आहे. असं एक मनसेच आंदोलन पुण्यात बघायला मिळालं. गुलाबाची फुलं हातात घेऊन गांधीगिरी करणारे मनसेचे कार्यकर्ते पिंपरीतल्या लोकांना पहायला मिळाले. सीबीएसई आणि आयसीएससी या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा कऱण्यात यावा, ही त्यांची मागणी होती. पण नेहमीसारखं मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोडीच्या मार्गाचा अवलंब केला नाही, तर गांधीगिरी केली. पुण्यातील सिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये हे आंदोलन झालं. मात्र सीबीएसई आणि आयसीएससीकडून आदेश आल्यावरच मराठीबाबतचा निर्णय होईल असं सिटी इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना मिश्रा यांनी सांगितलं.

close