अशोक चव्हाण-अमित देशमुख यांचं मनोमिलन?

October 25, 2013 2:40 PM0 commentsViews: 722

ashok and amit deshmukh25 ऑक्टोबर : नांदेडच्या लोहा नगरपालिकेच्या प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आमदार अमित देशमुख प्रथमच एकत्र आले. याच व्यासपीठावर दोन्ही नेत्यांचं मनोमिलन झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. विशेषत: राजकीय परिस्थिती पाहता या दोन नेत्यांचं मनोमिलन गरज असल्याचं मानलं जातंय.

 

मुंबईवर झालेल्या 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यात दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रीपदाची राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले. तो पर्यंत दोन्ही नेत्यांचे संबंध सलोख्याचे होते. मात्र महसूल आयुक्तालय लातूर ऐवजी नांदेडला करण्याचा निर्णय अशोक चव्हाणांनी घेतला यामुळे दोन नेत्यांमध्ये वितुष्ट निर्माण झालं.

 

पुढं चव्हाण मुख्यमंत्रीपदावरून पायउतरा झाले, तर विलासरावांचं अकाली निधन झालं. पण महसूल आयुक्तालयाच्या ठिकाणावरून वाद चिघळत गेला. आयुक्तालायापाठोपाठ मुंबई-लातूर रेल्वे नांदेडपर्यंत घेऊन जाण्याला लातूरकरांनी विरोध दर्शवला. यामुळे भविष्यात हे वाद चालत राहतील असं वाटत असताना अशोक चव्हाण आणि अमित देशमुख एकाच व्यासपीठावर आले आणि मराठवाड्याच्या नव्या राजकारणाची नांदी सुरू झालीय का याची चर्चा सुरु झालीयं.

close