अश्लिल मॅसेजेस पाठवण्यार्‍या तरुणाची बेदम धुलाई

October 25, 2013 6:42 PM0 commentsViews: 10531

25 ऑक्टोबर : सोशल नेटवर्किंग साईटवरुन अश्लिल संदेश पाठवणार्‍या एका तरुणाला तरुणीनं चांगलाच चोप दिलाय. ठाण्यात राहणार्‍या ही तरुणी सिनेमांमध्ये कोरियोग्राफर म्हणून काम करते. सोशल नेटवर्किंग साईटवरुन ज्योती कुमार याचाशी या तरुणीशी ओळख झाली होती. कुमारनं सिनेमात काम देतो असं अमिष दाखवत या तरुणीशी सतत संवाद ठेवला. आणि नंतर त्यानं तिला अश्लील संदेश पाठवायला सुरुवात केली. या सगळ्या प्रकाराला कंटाळून या तरुणीनं त्याला ठाणातल्या कोरम मॉलजवळ बोलावलं. यावेळी तरुणींने आपल्या नातेवाईकांनाही बोलावलं होतं. या सगळ्यांनी मिळून या भामट्याला चांगलाच चोप दिला. कुमारनं या तरुणीची पाया पडून माफी मागितली. एवढंच नाही तर त्यानं लेखी माफीही मागितली.

close