सावरकरांच्या ‘सहा सोनेरीपाने’पुस्तकाला छावाचा विरोध

October 25, 2013 8:36 PM1 commentViews: 1546

svarkar book24 ऑक्टोबर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेल्या भारतीय इतिहासातील ‘सहा सोनेरी पानं’ या पुस्तकाला छावा संघटनेनं विरोध केलाय.

 

पुस्तकात शिवाजी महाराजांचा अपमान करणारा मजकूर असल्याचा आरोप त्यांनी केलाय. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात पुस्तकाची होळी करण्याचं आंदोलन हाती घेतलाय. मुंबईतल्या दादर इथल्या सावरकर स्मारकासमोरही छावा संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पुस्तक जाळण्याचा प्रयत्न केला.

 

पण त्याअगोदरच पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतला. या पुस्तकात कल्याणच्या सुभेदाराच्या सुने संदर्भात या पुस्तकात मजकूर असून त्याला छावा संघटनेनं विरोध केलाय. हे पुस्तकचं प्रकाशित झालंय. जर हे पुस्तक ज्या दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलं असेल तिथे आम्ही अशाच पद्धतीने विरोध करु असा इशारा छावा संघटनेनं दिला.

  • Raj

    Who gave right to Chawa, Bawa to do this. Its time people of this state unite and show this people where they belong. Where is Shiv Sena and MNS. Its time they should come out and support Saverkar book and throw these Chawa/Bawa out of this state. Good for nothing people, don’t do any concrete work. Char gosthi kaadi chanlya karnar naahi……

close