‘बीडीपी’चा निर्णय चुकीचा -मुख्यमंत्री

October 25, 2013 9:25 PM0 commentsViews: 198

Image img_239812_cmonreccors_240x180.jpg25 ऑक्टोबर : टेकड्यांवर मर्यादित प्रमाणात बांधकामांना परवानगी देण्याचा प्रस्तावबद्दल झालेला निर्णय चुकीचा असल्याची भूमिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलीय. या प्रस्तावाबद्दल पुनर्विचार करण्याचा प्रश्नच नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

 

आज शिवसेना आमदार निलम गोर्‍हे आणि काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. टेकड्यांवर मर्यादित प्रमाणात बांधकामांना परवानगी देण्याचा प्रस्ताव गुरूवारी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला होता.

 

महत्वाचं म्हणजे यावेळी राष्ट्रवादीच्या साथीला भाजप धावला. या प्रस्तावाला,काँग्रेस मनसे आणि शिवसेना विरोध करत असताना राष्ट्रवादीने भाजपच्या साथीने थेट मतदान घेतलं. काँग्रेस,मनसे आणि शिवसेने सभात्याग केला मात्र त्यांनी तरीही हा प्रस्ताव रेटत त्यावर मतदान घेऊन त्याला मंजुरी देण्यात आली.

close