मंदीच्या काळात बाबा कल्याणी ठरले आदर्श

February 5, 2009 4:38 PM0 commentsViews: 70

5 फेब्रुवारी, नवी दिल्लीतन्वी शुक्ला / प्रियल गुलियानीमंदीच्या काळात कर्मचार्‍यांचे पगार कमी करण्यासाठी प्रत्येक कंपनी टपलीय. पण भारत फोर्जच्या बाबा कल्याणींनी मात्र एक वेगळा आदर्श घालून दिलाय. त्यांनी फक्त कर्मचार्‍यांचा पगार कमी केला नाहीये. तर स्वतःचाही पगार कमी केलाय. मंदीचे खूप चटके ऑटो इंडस्ट्रीला बसतायत पण त्यावर मात करताना कल्याणींसारखी माणसं कर्मचार्‍यांच्या जोडीनं काम करतायत.ऑटो इंडस्ट्रीचे दिवस सध्या फिरलेत ते मंदीमुळे.. आणि या जागतिक मंदीच्या कचाट्यात सापडल्यामुळेच भारत फोर्जसारख्या कंपनीलाही कर्मचार्‍यांचे पगार कमी करावे लागलेत. पण इथं प्रत्यक्ष कंपनीचे सीएमडी बाबा कल्याणी यांचाही पगार वीस टक्क्यानं घटलाय. इतर सिनिअर एक्झिक्य्‌ुटीव्हज्‌चे पगार ही पाच ते 20 टक्क्यांनी कमी झालेत. तसंच खेळतं भांडवलही 200 कोटींनी कमी करण्याचं लक्ष्य ठेवलंय. " जेव्हा अशा आर्थिक समस्या येतात तेव्हा पैशांचं व्यवस्थापन महत्त्वाचं ठरतं आणि मग अशावेळी खेळत्या भांडवलाकडेच जास्त लक्ष द्यावं लागतं.मी माझी स्वत:ची सॅलरी 20 टक्क्यांनी कमी केली आहे, " अशी माहिती भारत फोर्जचे सीएमडी बाबा कल्याणींनी दिली.पैशांची बचत करताना कंपनीनं उर्जा बचत आणि वेस्ट मॅनेजमेंटकडेही लक्ष दिलंय. तसंच त्यांच्या पॉवर, ऑईल, गॅस अशा काही इतर उद्योगातून 2010 सालापर्यंत चाळीस टक्के महसूल मिळवण्याचंही उद्दीष्ट कंपनीनं ठेवलंय.

close