दिल्लीच्या पथकाने केली कांद्याची पाहणी

October 25, 2013 10:24 PM0 commentsViews: 113

25 ऑक्टोबर : कांदा खरेदी करण्यासाठी दिल्लीहून नाशिकला आलेलं पथक आज बाजार समित्यांना भेट देऊन कांद्याची पाहणी केली. इथला बहुतेक कांदा पावसामुळे भिजला असल्याचं त्यांनाही आढळून आलं. दरम्यान, त्यांनी जाहीर लिलावामधून कांदा खरेदी करावा, अशी भूमिका सर्व बाजार समित्यांनी घेतलीय. कांदा व्यापारातल्या विफ्को या सहकारी संस्थेतर्फे दिल्ली सरकार हा कांदा खरेदी करू शकतं. याबद्दलची चर्चा झाली. टीम दिल्लीत पोहोचल्यानंतर दिल्ली सरकार याबद्दलचा निर्णय घेईल.

close