अजित पवार -उदयनराजे भोसले एकाच व्यासपीठावर एकत्र

October 26, 2013 2:51 PM0 commentsViews: 1931

udyanraje bhosle426 ऑक्टोबर : सातार्‍यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा सुरू आहे. हा एकदिवसाचा मेळावा सातार्‍यातल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात होणार आहे.

 

या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर आर पाटील, आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते हजर आहेत. विशेष म्हणजे सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसलेसुद्धा आवर्जून उपस्थित आहेत.

 

गेल्या काही काळात अजित पवार यांच्यासोबत व्यासपीठावर येण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. या मेळाव्याल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार होते. पण दिल्लीतल्या व्यस्त कार्यक्रमांमुळे ते आज उपस्थित राहू शकले नाहीत.

 

गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीत धूसफुस सुरु होती. मध्यतंरी भोसले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीमुळे भोसले राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा होती. आज एकाच व्यासपीठावर उदयनराजे भोसले आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर आले आहे.

close