ठाण्यात विवाहितेवर सामूहिक बलात्कार,3 आरोपींना अटक

October 26, 2013 1:52 PM0 commentsViews: 1169

thane_rape26 ऑक्टोबर : ठाण्यात एका विवाहितेवर सामूहिक बलात्काराची दुर्देवी घटना घडलीय. या प्रकरणी विनोद जाधव, लक्ष्मण आणि ब्रम्हा जयपाल या तिन्ही नराधमांना अटक करण्यात आलीय. या तिन्ही आरोपींविरोधात अपहरण, बलात्कार आणि ऍट्रोसिटी असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

पीडित महिलाही ठाण्यातल्या एका खाजगी कंपनीत काम करते. या प्रकरणातील एक आरोपी वर्षभर या महिलेच्या मागावर होता. विनोद जाधव, लक्ष्मण आणि ब्रम्हा जयपाल या तिघांनी तिला गाडीतून निर्जन ठिकाणी नेलं. आणि गाडीतच तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला तिथंच सोडून देण्यात आलं.

 

भीतीपोटी हा प्रकार या महिलेनं घरी सांगितला नव्हता. पण तिच्या पतीला हा प्रकार कळल्यावर त्यानं डायघर पोलीस स्टेशनध्ये या तिघांविरोधात तक्रार नोंदवली. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तसंच या महिलेला वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

close