झिरो डिग्री पबवर पोलिसांनी टाकला छापा : 20 विद्यार्थ्यांना अटक

February 5, 2009 3:49 PM0 commentsViews: 1

5 फेब्रुवारी, मुंबई मुंबईतल्या मुलुंड इथं झिरो डिग्री पबवर छापा टाकण्यात आलाय. या छाप्यात चरस सापडलंय. याप्रकरणी 20 विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केलीय. पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं ही कारवाई केलीय. मुलुंडमधल्या निर्मल लाईफ स्टाईल या मॉलमध्ये झिरो डिग्री पब आहे. दरम्यान, झिरो डिग्री पब बंद करावा या मागणीसाठी युवक काँग्रेसनं निर्मल लाईफ स्टाईलवर मोर्चाही आणला. कार्यकर्त्यांनी तिथं जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मोर्चा पांगला.

close