कोल्हापुरात टोलविरोधात महापदयात्रा

October 26, 2013 4:23 PM1 commentViews: 183

kolhapur toll26 ऑक्टोबर : कोल्हापुरकरांनी आज पुन्हा एकदा टोलविरोधात रणशिंग फुंकलंय. आज शहरातल्या मॉर्निंग वॉक करणार्‍या नागरिकांनी टोलविरोधात महापदयात्रा काढून टोलला विरोध दर्शवला.

 

शिवाजी विद्यापीठापासून ते ताराराणींच्या पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार सुजित मिणचेकर यांनी या पदयात्रेचं आयोजन केलं होतं.

 

या पदयात्रेत हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. महिलांचाही यात मोठा सहभाग होता. त्यामुळे आज कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा ‘देणार नाही टोल आम्ही देणार नाही ‘ ही घोषणा पहाटेच ऐकायला मिळाली.

  • VISHAL PATIL

    ya congresswalna amhi kolhapuri janata election madhe changlach kolhapuri hiska dhakhanar ahot!

close