पाक सरकारनं केला पुन्हा एकदा खोटारडेपणा

February 5, 2009 4:52 PM0 commentsViews: 1

5 फेब्रुवारीअतिरेक्यांविरोधात कारवाई करत असल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय. पण, पाकिस्तानातल्या बारा दहशवादी संघटनांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाहीर बैठक घेतली. त्यात बंदी घातलेल्या संघटनाही होत्या. युनायटेड जेहाद काऊन्सिलनं ही बैठक बोलावली होती. त्यात जैश-ए-मोहम्मद, जमात उद-दावा आणि हरत-उल-मुजाहिद्दीन या संघटनांनीही भाग घेतला होता. मुंबई हल्ल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच अशी बैठक घेतली. जमात आणि लष्करच्या अटक केलेल्या दीडशे अतिरेक्यांना सोडण्याची मागणी त्यांनी सरकारकडं केली. विशेष म्हणजे अतिरेक्यांच्या या बैठकीवर बंदी घालण्याचा प्रयत्न सरकारनं अजिबात केला नाही.

close