भारताने चौथी वनडे जिंकली

February 6, 2009 6:22 AM0 commentsViews:

5 फेब्रुवारी कोलंबोभारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं झालेली चौथी वन डे मॅच भारताने 67 रन्सनी जिंकली. या आधी भारताने श्रीलंकेसमोर जिंकण्यासाठी 333 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण श्रीलंकेची सर्व टीम 265 रन्सचं करू शकली. श्रीलंकेच्या वतीने कुमार संगकाराने सर्वात जास्त 56 रन्स केले. तर भारताकडून इरफान पठाणने 3 विकेट घेतल्या. प्रवीण कुमार आणि सेहवागने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. भारताचा हा सलग नववा विजय आहे. गौतम गंभीरला मॅन ऑफ द मॅन देण्यात आलं.

close