राज्य बँकेवरून बाबा-दादांमध्ये रंगला कलगीतुरा

October 26, 2013 9:47 PM1 commentViews: 1115

26 ऑक्टोबर : राज्य सहकारी बँकेच्या कारभारावरुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. राज्य सहकारी बँक प्रशासक नेमल्यामुळे नाही तर राज्य सरकारनं 31 मार्च अगोदर सव्वा तीनशे कोटी रुपयांची मदत केल्यामुळे फायद्यात आलीय असा दावा करुन अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचा मुद्दा खोडून काढला. दोनच दिवसांपूर्वी मुख्यंत्र्यांनी पुण्यात बोलताना राज्य सहकारी बँकेनं शिस्त पाळली नाही म्हणून बँक तोट्यात गेली आणि प्रशासक नेमल्यानंतर राज्य सहकारी बँक फायद्यात आली असा दावा केला होता. तसंच बँकेच्या कामात शिस्त पाळली गेली पाहिजे जर शिस्त पाळली गेली नाही तर कुणाची गय केली जाणार ताबोडतोब संचालक मंडळ बरखास्त केलं जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला होता.

  • prashantexpress

    सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गेल्या वर्षापर्यंत बँकिंग लायसन्स शिव्याच धंदा करीत होती.. हा प्रकार म्हणजे बेकायदेशीर सावकारीच ! त्याचे काय?

close