पाटणा साखळी स्फोटाने हादरले, ५ ठार

October 27, 2013 5:52 PM1 commentViews: 852

patna balast 2२७ आॅक्टोबर : गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या रॅलीच्या अगोदर बिहाराची राजधानी साखळी स्फोटाने हादरली. या स्फोटात ५ जणांचा मृत्यू झालाय तर ५० लोक जखमी झालेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टाईमर लावून हे स्फोट घडवण्यात आले. एकूण सहा स्फोट झाले.  पहिला स्फोट हा पाटणा स्टेशनवर प्लॅटफाॅर्म नंबर १० वर एका शाैचालयात झाला. यात एक व्यक्ती जखमी झाला जखमीला मेडिकल काॅलेजमध्ये दाखल केले असता उपचारअगोदरच त्याचा मृत्यू झाला. तर दुसरा स्फोट एलफिस्टन सिनेमा हाॅलच्या समोर झाला. यानंतर गांधी मैदानजवळ चार स्फोट झाले. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. ज्या ठिकाणी स्फोट झाले तो परिसर खाली करण्यात आलाय. बाॅम्बनाशक पथकाचं पाचारण करण्यात आलंय. केंद्रीय गृहमंत्रालयाने स्फोट संबंधीचा रिपोर्ट मागवलं आहे. घटनास्थळी दोन गावठी बाॅम्ब ठेवण्यात आले  होते. त्यातला एक बाॅम्ब आज सकाळी ९ वाजून १५ मिनिटाने फुटला.गृहमंत्रालयाने हे कृत्य दहशतवाद्यांनी घडवून आणल्याची शक्यता फेटाळून लावलीय. स्फोटांचा सर्व अंगाने  तपास सुरू आहे.

  • VIJAY KOKANE

    VIRODHI PAKSH JAR KAHI CHANGALE KARAT ASEL TAR TE AAGHADI SARKARLA PAHAVALE JAT NAHI. MODINCHYA BHASHANA AGODAR ZALELA HA BOMBSFOT
    LOKSHAHI PRATIMELA DHAKKA DENARA AAHE.

close