नरेंद्र मोदींचे नितीशकुमारांवर टीकास्त्र

October 27, 2013 6:32 PM0 commentsViews: 928

Image img_218002_modionsoniya4_240x180.jpg२७ आॅक्टोबर - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या राजधानी पाटण्यात झालेल्या रॅलीत नितीश कुमारांवर निशाणा साधला. जेडीयूशी यूती तुटल्यानंतर मोदींनी नितीश कुमारांच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदा सभा घेतली. अपेक्षेप्रमाणे मोदींनी नितीश कुमारांवर टीकास्त्र सोडले.

 

विधानसभेत जास्त जागा जिंकून ही केवळ जंगलराज संपवण्यासाठी नितीशकुमारंना पाठिंबा दिला पण त्यांना पंतप्रधानपदाचे स्वप्न पडू लागल्यामुळे त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. त्यांनी जनतेशी विश्वासघात केला अशा विश्वासघातकी पक्षाला निवडणुकीत धडा शिकवा. जी लोकं जयप्रकाश नारायण यांना विसरू शकता ती भाजपलाही विसरून शकतात अशी टीका मोदींनी केली.

 

तसंच गरिबी आणि रेल्वे समस्यांची पूर्ण माहिती आहे रेल्वेच्या डब्यात चहा विकणाऱ्याला रेल्वेच्या समस्यांबाबत जेवढं माहित असतं तेवढं रेल्वे मंत्र्यांनाही माहित नसतं असा टोलाही मोदींनी लगावला. तसंच कमळावर कितीही चिखलफेक केली तरी कमळ आणखी उमलणार असंही मोदी म्हणाले. दरम्यान, स्फोटांमुळे मोदींची रॅली रद्द होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती पण मोदींनी आपली नियोजित सभा घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

close