राहुल गांधींच लॅपटॉप पॉलिटिक्स

February 5, 2009 5:26 PM0 commentsViews: 1

5 फेब्रुवारी काँग्रेसचे तरूण नेते राहुल गांधी यांनी यशाचा नवा मंत्र दिला आहे. कम्प्युटर शिका आणि निवडणुका जिंका. त्यामुळे कम्प्युटर शिकून किमान निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठी काँग्रेसच्या तरूण नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. अनेक उत्सुक नेत्यांपैकी नूर हा बिहारमधला काँग्रेसचा तरुण नेता. त्यानं कम्प्युटरचे धडे गिरवलेत. कम्प्युटर हाताळण्याचं त्याचं कौशल्य त्याला या निवडणुकीत काँग्रेसचं तिकीट मिळवून देऊ शकतं. काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांसाठी कम्प्युटरचं ज्ञान हाच उमेदवार निवडीचा सर्वोत्तम निकष असावा, असा राहुल गांधींचा आग्रह आहे.पण समस्या इथून सुरू होते. नूर हा बिहारचा आहे.काँग्रेसच्या हेडक्वार्टरमध्ये यायला उत्सुक असलेल्या अडीचशे तरुणांपैकी तो एक. पण घड्याळ्याच्या काट्याशी त्याला स्पर्धा करावी लागणार आहे. कम्प्युटरमध्ये मास्टरी मिळवायला त्याच्याकडे फक्त दोन महिने आहेत. त्यानंतर गावी परतल्यानंतर बिहारमधल्या वीजेचा लपंडावामुळे त्याचा कम्प्युटर नॉट रिचेबल होणार आहे. त्यामुळेच सत्तेच्या स्पर्धेत तो मागे पडण्याची शक्यता आहे.राहुल गांधींनी उत्तरप्रदेशातल्या निवडणुकीपासून लॅपटॉप पॉलिटिक्स रुजवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राहुल गांधी हे प्रमोद महाजन यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत, असं काही जणांचं मत आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, काँग्रेसची कामगिरी सुधारण्यासाठी लॅपटॉपचा काहीच उपयोग होऊ शकणार नाही.

close