राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद भरा अन्यथा..!

October 28, 2013 2:34 PM0 commentsViews: 210

Image img_227402_mahilaayog453_240x180.jpg28 ऑक्टोबर : एकीकडे राज्यात दिवसेंदिवस महिलांच्या अत्याचारात वाढत आहे.मात्र गेल्या चार वर्षांपासून सरकारला याच्याशी काहीही घेणं देणं नाही. गेल्या चार वर्षांपासून राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद अजूनही रिक्तच आहे. या प्रकरणी विहार दुर्वे या सामाजिक कार्यकर्त्यांने राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कायदेशीर नोटीस पाठवलीय.

 

आठ दिवसात राज्य महिला आयोगाचं रिकामं ठेवण्यात आलेलं अध्यक्षपद भरा अन्यथा राज्य सरकारच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात येईल. मग सरकारला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा या कायदेशीर नोटिशीत देण्यात आलाय. गेली चार वर्ष हे पद रिकामचं आहे.

 

अशा स्थितीत आयोगाकडे महिलांच्या अत्याचाराच्या विरोधातल्या तब्बल 5,679 तक्रारी पडून आहेत.अनेकवेळा विविध महिला संघटना आणि कार्यकर्त्यांकडून तक्रारी आल्यानंतर देखील यावर अद्याप पाऊल उचललं गेलेलं नाही. या प्रकरणी विधिमंडळाच्या अधिवेशनांमध्येही वेळोवेळी आवाज उठवला गेला. मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासनं दिली गेली.

close