राहुल यांच्याविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

October 28, 2013 2:50 PM0 commentsViews: 258

bjp on rahul28 ऑक्टोबर : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ISI आयएसआयच्या वक्तव्यावरुन भाजपने राहुल गांधीविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. इंदूरच्या सभेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याविषयी ही तक्रार करण्यात आली.

 

मुझफ्फरनगर दंगलीनंतर ISI मुस्लीम युवकांच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं आणि त्याविषयीच निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. मुख्तार अब्बस नक्वी, प्रकाश जावडेकर, निर्मला सीतारामन यांचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाचे आयुक्त यांची भेट घेतली आणि तक्रार दाखल केली.

close