राहुल खरं तेच बोलले, शिवसेनेनं केली पाठराखण

October 28, 2013 3:03 PM0 commentsViews: 1293

samana on rahul28 ऑक्टोबर : “मुझफ्फरनगरच्या दंगलीत आयएसआयचा हात आहे आणि दंगलीच्या झळा बसलेले मुसलमान युवक आयएसआयच्या संपर्कात आहेत” असं वक्तव्य काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी मुझफ्फरनगरातल्या जाहीर सभेत केलं होतं. यावर भाजपने आक्रमक पवित्रा घेत थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली पण एनडीएची घटक पक्ष शिवसेनेनं मात्र राहुल गांधी यांची पाठराखण केलीय. ‘सामना’या शिवसेनेच्या मुखपत्राने राहुल गांधी यांची बाजू लावून धरलीये.

 

राहुल चुकून खरं बोललेत. त्यामुळे त्यांना दरवेळी झोडपलंच पाहिजे असं नाही असं या अग्रलेखात म्हटलंय. पाकिस्तानची आएसआय ही गुप्तचर संघटना भारतातल्या दंगलपीडित मुस्लिमांना हाताशी धरत असल्याचंही या अग्रलेखात म्हटलंय.

 

आयएसआय ही पाकिस्तानी संघटना नेहमीच दंगलपिडित भारतीय मुसलमान युवकांना हाताशी धरून दंगल घडवत आलीय असं म्हणत राहुल गांधी हे चुकून खरं बोलले आहेत, म्हणून त्यांना झोडपलच पाहिजे असा नियम नाही अशी भूमिका शिवसेनेच्या मुखपत्रात मांडून एक प्रकारे नरेंद्र मोदींचा उल्लेख टाळून त्यांच्या भुमिकेचा धिक्कार केला गेलाय. राहुल गांधींच्या भुमिकेविरूद्ध जो प्रचारी धुरळा उडवला जातोय. त्यात सत्य हरवताना दिसत असल्याचा टोलाही लगावण्यात आलाय.

 

रविवारीच्या पाटण्याच्या सभेत मोदींनी हिंदू-मुस्लीम एकतेचा नारा दिला आहे. या पार्श्वभुमीवर सामनाची ही भुमिका बोलकी आहे. आपण हेच सत्य मांडत आलो मात्र काँग्रेसनं ते आरोप नाकारले होते. आता युवराज हीच भूमिका मांडत आहेत याकडं या अग्रलेखातून लक्ष वेधण्यात आलंय. विशेष म्हणजे या अगोदरही सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका आणि नंतर सारवासारव करण्याची नामुष्की सेनेवर आली होती.

close