परप्रांतीय मुलींच्या मदतीसाठी मनसेचे कार्यकर्ते सरसावले

February 5, 2009 2:31 PM0 commentsViews: 134

5 फेब्रुवारी पुणेमनसे म्हणजे तोडफोड सेना असं एक समीकरण बनलंय. मात्र पुण्यात परप्रांतीय मुलींच्या मदतीसाठी मनसेचेच कार्यकर्ते पुढे सरसावले.पुण्यातल्या बुधवार पेठेत एका कुंटणखान्यावर पोलिसांनी रेड टाकली. यावेळी तिथल्या दोन मुलींना सोडवण्यात आलं. यापैकी एक मुलगी गुवाहाटी तर दुसरी बिहारची आहे. त्या दोघींना गेल्या तीन ते चार महिन्यांपासून डांबून ठेवण्यात आलं होतं. त्यांची पोलिसांच्या मदतीनं मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुटका केली. कुंटणखान्याच्या मालकिणीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे, पोलिसांनी तिला अटकही केली आहे.

close