मालिश भोवली, ‘ती’ शिक्षिका निलंबित

October 28, 2013 4:28 PM4 commentsViews: 14573

28 ऑक्टोबर : मुकबधीर विद्यार्थ्यांकडून पायाला मालिश करून घेणार्‍या शिक्षिकेवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. अकोल्यातील शासकीय मुकबधीर विद्यालयात विद्यार्थ्यांकडून पायाला मालिश करून घेणाचा घृणास्पद प्रकार घडला होता. शीतल अवचारे असं या शिक्षकेचं नाव आहे. निलंबित कार्यकालात त्या शिक्षिकेला औरंगाबाद मुख्यालयात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निलंबित कार्यकाळात त्यांना फक्त निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे अशी माहिती अकोला शासकीय मुकबधीर विद्यालयाचे अधीक्षक प्रल्हाद लांडे यांनी दिली. मात्र या शिक्षिकेनं आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले.

 • Rinku Bhardwaj

  kya hoga is desh ka ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय

 • रत्नाकर पवार

  त्या शिक्षिकेला तिची बाजू कॅमे-यासमोर मांडू द्या. खरं खोटं तिलाच कळेल. की मांजर ज्यावेळेला दुध पीतं त्यावेळेला तिचे डोळे बंद असले तरी जगाचे उघडे असतात. आणि हे त्या मांजरीच्या पेकाटात लाथ बसल्यावर तिला लक्षात येते.

 • रत्नाकर पवार

  व्हिडिओची तपासणी करा. मला वाटते हि बाई खोट बोलत असण्याची दाट शक्यता हिच्या बोलण्यातून वाटते.

 • mandar shingade

  shikshakane kela kahar,
  shikshan khate zopale ahe laun gajar….
  saglyanchi ahe ya var najar

close