टोलविरोधात दिंडी

October 28, 2013 4:51 PM0 commentsViews: 140

28 ऑक्टोबर : कोल्हापूरमध्ये शिवसेनेनं टोलविरोधात अनोख आंदोलन केलंय. शहरातल्या शाहू टोल नाक्यावर शिवसेनेन वारकरी दिंडी काढून टोलला विरोध दर्शवला. टाळ आणि मृदुंगाच्या गजरात शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना टोल रद्द करण्याची सुबुद्धी दे असं साकडं विठ्ठलाला घातलं. जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी टोलनाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

close