अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ल्याचा प्रयत्न

October 28, 2013 5:15 PM0 commentsViews: 572

28 ऑक्टोबर : ठाणे जिल्ह्यातील नालासोपारामध्ये नववीत शिकणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ल्याचा प्रयत्न झाला. पण पोलिसांनी टाळाटाळ करुन शेवटी रविवारी संध्याकाळी गुन्हा दाखल केला. शनिवारी संध्याकाळी, लाईट गेले म्हणून ही तरुणी दिव्याच्या उजेडात अभ्यास करत होती. एक अज्ञात व्यक्ती तिच्या मागून आली आणि तिच्या चेहर्‍यावर ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं तिच्या चेहर्‍यावर ऍसिड पडलं नाही. पण पोलिसांचा हलगर्जीपणा असा की गुन्हा नोंदवायला त्याना तब्बल 24 तास लावले. मात्र या प्रकरणी अजून कुणालाही अटक करण्यात आली नाही. पोलीस अधिक तपास करत आहे.

close