श्रीलंकेतल्या संघर्षावरून केंद्र सरकारमध्ये मतभेद

February 5, 2009 5:37 PM0 commentsViews: 2

5 फेब्रुवारी दिल्लीश्रीलंकेतल्या संघर्षावरून केंद्रातल्या दोन मंत्रालयांमध्ये मतभेद निर्माण झालेआहेत. लिट्टेशी 48 तासांची युद्धबंदी करायला भारतानं दबाव टाकून श्रीलंकेला राजी केलं होतं. पण लिट्टेनं ही शस्त्रसंधी धुडकावून लावली, असं केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटलंय. त्यावर कुठल्याही देशानं आपल्यावर दबाव टाकला नव्हता, असं श्रीलंकेनं ताबडतोब स्पष्ट केलंय. आणि लिट्टेही अतिरेकी संघटना असल्यानं त्याला सहानुभूती दाखवण्याची गरज नाही, असं श्रीलंकेनं म्हटलंय. पण परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी चिदंबरम यांच्या नेमकं उलटं वक्तव्य केलंय. लिट्टेविरोधात कारवाई थांबवायला भारतानं श्रीलंकेवर दबाव आणला नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

close