एका वकिलाची ‘पद’स्पर्श कहाणी !

October 28, 2013 7:08 PM0 commentsViews: 560

उदय जाधव, मुंबई
28 ऑक्टोबर : जन्मताच हात नसलेले अंबिकाप्रसाद क्षीरसागर गेली आठ वर्षांपासून ते वकिली करत आहेत. आपण जसे हाताने लिहितो, अगदी त्याच सहजतेने क्षीरसागर वकील, पायाने लिहीतात. त्यामुळे त्यांच्या वकिली सेवेत कुठलीच अडचण येत नसल्याचंही ते सांगतात.

वकील होण्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली आणि विशेष म्हणजे त्यांनी त्यांच संपुर्ण शिक्षण कोणतंही आरक्षण न घेता पूर्ण केलं. शरीर धडधाकट असून देखिल अनेक जण परावलंबी असल्याचं आपण पाहतो. पण क्षीरसागार वकिलांची जिद्द, सर्वांनांच प्रेरणा देणारी आहे.

close